|| निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त तथा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय प्रथम पारीतोषिक विजेता ||
स्थापना : १९३६
?>

इतिहास

धामणेर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव , कृष्णामाईच्या काठावर वसलेलं. निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं. काळ्याशार शेतसरीनं वेढलेलं. त्याचबरोबर एक संपन्न असा आध्यात्मिक वारसा असलेलं. कधीकाळी इथं वैदिकांचं पुण्यक्षेत्र होतं, ज्याला धर्मपुरी या नवानं ओळ्खलं जात असे. तसेच गावाच्या उत्तरेस जवळच असलेल्या निगडी गांवाचे रंगनाथ स्वामी यांनी ज्ञानपीठ चालवलेलं होतं.त्या ठिकाणी श्रावणात मोठी यात्रा भरत असे. धामणेरच्या जवळच कृष्णामाईच्या डोहात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींनीं आंग्लाई देवी व प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती सापडल्या होत्या. याच मूर्तींची प्रतिष्ठापना स्वामींनी अनुक्रमे सज्जनगड व चाफळ या क्षेत्री विविधत केली , असा इतिहास आहे. म्हणजे साक्षात समर्थांचा पावन पदस्पर्श इथल्या मातीत झालेला होता.

पायाभूत सुविधांचा विकास

1
यशवंत ग्रामपंचायत कार्यालय धामणेर
2
स्मशान भूमी
8
बाजार गाळे

इतर सुविधा

हिराजी अप्पाजी धामणेरकर क्रीडांगण

सार्वजनिक कार्यक्रमाचे स्टेज व खेळाचे मैदान

जागृती वाचनालय धामणेर

कादंबरी व मासिके, सर्व वर्तमानपत्रे

कै. इंदुमती पवार गुणवत्ता विकास वर्ग

एम. पी. एस. सी. व यु. पी. एस. सी. अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके

व्यायाम शाळा धामणेर

व्यायामाचे सर्व साहित्य आहे

रमनलाल वाडीलाल शहा बालउद्यान

घसरगुंडी, झोपाळा

मारुती उद्यान धामणेर

बगीचा व घसरगुंडी, झोपाळा

पुरस्कार

मिळणारे उत्पन्न

3070094
पंचायतीचे वार्षिक उत्पन्न
427420
करापासून मिळणारे उत्पन्न
2642674
सरकारी अनुदानापासून